बस स्टॉप आणि गप्पा…

गप्पा गोष्टी आणि आठवणी!

लघु-लेख

भेटूया असं ठरताच, कुठे? हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. पण कधी कधी काही ठिकाणं आपसूकच आपल्याला बोलवतात. त्यातलंच एक म्हणजे बस स्टॉप. फारसं काही विशेष वाटणार नाही यात काही जणांना. पण जे त्यांचा वेळ तिथे घालवत होते किंवा घालवतात अजूनही, त्यांना मात्र आठवतील ते क्षण. त्यांच्या रंगलेल्या गप्पा. इतरांचं काय माझेच किती तरी छान क्षण आहेत बस स्टॉपशी जुळलेले.

ह्या आधी ऑफिसला जाताना लागायचं बस ने जायला यायला. मग तिला भेटायला जाताना ती जिथून बस पकडते तिथे जाऊन तिची वाट पाहणं. मग ती भेटल्यावर एकत्र कामाला जाणं. कधी-कधी तर त्याच बस स्टॉप वर बसून तासनतास गप्पा मारत बसायचो. जुन्या आठवणी नवे क्षण रंगवण्यात मग्न असायचो आम्ही. साहजिक आहे ती वेळच तशी असते. मनमौजी आणि कधीही न संपावी अशीच.

त्यात ही सगळी माणसं आपल्याकडेच बघणार. इतकं बारकाईने कि आपणच त्यांच्या घरातून पळून आलोय कि काय! आठवलं का हसू येत म्हणा… पण म्हणतात ना, काही क्षण काही व्यक्ती आपण नाही बदलू शकत आपल्या आयुष्यातून. आता आठवणी चांगल्या नक्कीच ठेवू शकतो. जरी व्यक्ती ठेवता आली नाही तरी.

@UgtWorld

Related Posts