परत कधी भेटणार?

कधी मुहूर्त सापडतोय कोण जाणे!

आज भेटलो, खूप मजा केली… यार परत कधी भेटणार आपण आता?” हाच प्रश्न दर वेळेला पडतो. मला तर हा प्रश्न नेहमीच पडतो. मैत्रीच्या त्या गेट-टुगेदर च्या शेवटाला सर्वच थोडे उदास असतात. खरं तर त्यात इतकी मजा केलेली असते, काही अतरंगी किस्से. जे जवळजवळ अविस्मरणीय असतात. कधी आठवण आली तर नकळत का असेना हसू येतं आणि मग त्यावर चर्चा सुरु होते.

सगळ्या जुन्या आठवणी, भेटूया लवकरच म्हणजे नवीन आठवणी तयार करायला मिळतील. अजून सुद्धा काही जण खूप वर्षांनंतर किंवा मग महिन्यांनी भेटतात. पण त्या भेटीत नवेपण असं काहीच आणि कधीच जाणवत नाही. असं वाटतं जिथे वाट अर्धी सुटली होती त्याच वाटेवर पुन्हा चालणार.असं काही आठवलं की किती तरी असंख्य भावना मनात येतात. त्यात काही स्पेशल व्यक्ती पण डोळ्यासमोर लगेच येतात.

अर्थात! काही वेळेला तर आपण त्या व्यक्तीला भेटता यावं, तिच्या सोबत वेळ खर्च करता यावा, याच विचारत गुंतून गेलेलो असतो. प्रत्येकाची एक तरी आवडती व्यक्ती असतेच कोणत्याही ग्रुप मध्ये. साहजिक आहे काही जण मित्र-मैत्रीण म्हणून आवडतात एकमेकांना. तर काही जण थोडंसं पुढे जातात. तर काही बिना लेबलचं त्यांचं नातं ठेवतात. आपली आवड निवड दुसरं काय!

@UgtWorld

Related Posts