बे-मौसम बरसात आणि खयाली पुलाव!
फावल्या वेळेत हेच सुचतं ना…
बाहेर मस्त पाऊस सुरु आहे. गरम गरम चहा आणि भजी केली तर मजा येईल ना! मस्त थोड्या गप्पा टप्पा मारू आपल्या साथीदारांसोबत. प्रेम गाणं गाऊ आपल्या आपल्या प्रेमाबरोबर. एकटा जीव असेल तर खायचं प्यायचं आणि निवांत पडायचं. या पेक्षा छान कल्पना काय असेल! असली तरी सांगा ते पण करता येईल. हे असंच होत, बे-मौसम बरसात आणि खयाली पुलाव!
किती गोष्टी पटपट सुचत जातात रिकामं असल्यावर. गेम खेळून तरी किती त्या मोबाइल चा जीव काढणार. ते नाही तर आहेच सोशल मीडिया आपल्यासाठी. तिथे आपल्यापेक्षा वरचढ माणसं असतात. फावल्या वेळेत आणि अशा वेळी काय काय नको करायला तेच कसं करायचं हे शिकवतात. काय म्हणावं आता ह्यांना… त्यांना म्हणून तरी काय आहे, करणारे तर करतच आहेत त्यांना आदर्श मानून.
आताच्या घडीला ना धड फिरत येत आहे, ना घरात बसवलं जात आहे. सगळं कोणत्या तरी गेमच्या न पार होणाऱ्या लेव्हल सारखं झालंय! होईल म्हणा कधी ना कधी ही लेव्हल पण पार. काही ना काही मिळेलच साधन पुढे जायला. बाकी जे टेन्शन मध्ये आहेत त्यांना खोटा दिलासा द्यायची इच्छा नाही, पण जाईल तुमचा पण खराब टाइम निघून. मजा करा आणि काय आता…