काश! एखादं असं ठिकाण असतं!
काश, त्या जागी कसलीच तगमग नसती…

या ‘काश’ शब्दामागेच कितीतरी गोष्टी दडल्या आहेत. आपण किती का प्रयत्न करेना पण कधी कधी ते असफल होण्यासाठीच असतात. तिथून पुढेच सर्व गोष्टींची आखणी बदलली जाते. आपल्या इच्छांना रोखलं जातं. आपल्या कर्तृत्वावर शंका घेतली जाते. काही वेळेला तर ध्येयाविना जगतो तू असाही उल्लेख केला जातो.
“शब्दामागे काळजी असते आमची”, मला तर ही ओळच खोटी वाटते त्या लोकांसारखी जे फक्त शब्दांच्या वाफा सोडत असतात. स्वतःच्या घरातल्या पारड्यात किती उधळले गेले आहेत याचा तरी विचारविनिमय करावा ना, कि सरसकट तोंडात येईल तसंच शेण खात सुटायचं. खरंतर काही बिनकामी माणसांची आपलंच रक्त आठवन्याची कामं असतात. असो, राहूदे त्यांना त्यांच्या जागेवरच.
बहुतेकदा तर असं मनात येत दिवसातले काही तास दूर निघून जावं मनःशांती साठी. किमान थोडा वेळ तरी स्वतःसाठी देता येईल. एक ठिकाण तरी किमान मिळावं जिथे निवांत का होईना थोडा वेळ घालवता येईल. हवं तस वागता येईल, खरेपणात राहता येईल. या खोट्या लोकांच्या प्रेमापेक्षा तिथे असलेला एकांत फार बरा पडेल. खोट्या नात्यातल्या माणसांपेक्षा तिथली एकाकी चांगली सोबत देईल इतकं मात्र नक्की…