अपुरी सोडलेली काही गणितं!

वेळेची आखणी आणि चुकलेली गणितं…

आयुष्यात आपण बऱ्याच गोष्टी करण्याआधी किंवा मग अर्ध्यातच सोडून देतो. त्याच्या मागची कारणं आपल्या प्रत्येकाकडे असतातच. त्यात काय हव होतं आणि काय नको होतं हे आपल्याला माहित असतं. पण काही वेळेला त्यात काय आणि कुठं आपण कमी पडतोय हे आपल्याला कधी कधी कळत नाही. मग आपण चुकीच्या पद्धतीत पुढे जाऊ लागतो. वेळेची आखणी बिघडते आणि आयुष्यात गणितं चुकतात.

आपण कित्येक वेळा ते गणित सोडवण्याच्या नितांत प्रयत्नात असतो. पण काही केल्या आपल्याकडून ते सोडवलं जात नाही. अर्थात आपण एका वेळेला वैतागून ते सगळं सोडून देतो. पुढे काय हाच प्रश्न मनात येऊन सारखं उभा राहत असतो. कुठेतरी एखादी व्यक्ती भेट घेते आपली आणि आपल्या गोष्टींमध्ये रस घ्यायला सुरु करते.

व्यक्तीचं असं लेबल नाही लावणार मी. कारण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेगळ्या-वेगळ्या व्यक्ती असतात. ज्या त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे आधार देत असतात. आणि सोबत बनून जातात त्या वेळेसाठी. गरजेचं नसतंच म्हणा कोणी एकच व्यक्ती असेल आपल्यासाठी सतत. पण कधी कधी कोणी एकच पुरून उरतं आपल्यासाठी. आपल्या आयुष्यातली अपुरी गणितं सोडवायला.

@UgtWorld

Related Posts