वेळ आणि सेलेब्रेशन यांची गल्लत…
सेलेब्रेशन कि सुटका व्यस्त त्रासातून!
हल्ली वेळेच्या बंधनात अडकताना किती तरी गोष्टी अडकून राहतात. व्यस्त व्यस्त अरे किती व्यस्त, थोडा तरी वेळ काढ. पण वेळ नाहीये रे, स्वतःच्या झोपेसाठी. फिरतीसाठी सुटका कुठे मिळेल. हेच संवाद सतत आपल्या कानी पडत आहेत. पडणारच ना! सगळेच मग्न आपल्या आपल्या कामामध्ये. घर, काम, घरातलं काम! त्यातून वेळ मिळाला तर जरासा जीवाला आराम. मग सेलेब्रेशन आणि वेळ यांची गल्लत होणारच ना.
पण जरासा तरी वेळ मिळतोच, खरतर आपण तो काढतो. कारण कधी कधी माणसं महत्वाची होऊन जातात पैश्यांपेक्षा. हा आता सतत करता येत नाही म्हणा आपल्याला तसं. तरी सुद्धा आपण कसबस करून त्या वेळेशी जुळवून घेतो. आता सेलेब्रेशन म्हटलं कि वेळ हवा दिलखुलास वेळ हवा. ते ही प्रत्येक वेळी जमत नाही.
स्वतःसाठी, आपल्या सुखासाठी किमान वेळ निघतोच. कामावरून थेट भेटीगाठी होतात. वेळेचं भान राहात नाही. थकवा नाहीसा होऊन जातो. ते चेहरे, त्यांचं आपल्या जवळ असणं ह्यातच सगळं मनासारखं होऊन जात. गल्लत तर होतेच ना पण आपल्या कडे मार्ग देखील तसेच असतात. फक्त त्या मार्गावर चालायला हवं आपण. वेळेतच सेलेब्रेशन होऊद्या वेळेनंतर अर्थ नाही त्याला काही.