का करतात असं, का तोडतात विश्वास?

का? असं करून मिळतं काय!

लघु-लेख
का करतात असं, का तोडतात विश्वास?

का करतात असं, का तोडतात विश्वास मनाचा इतक्या सहजतेने. समोरचा तुम्हाला काहीतरी सांगतो. काहीतरी मनातलं तुमच्याजवळ वाटतो, ते ह्या हिशोबाने जेणेकरून तुम्ही ते कोणाला दुसऱ्याला सांगणार नाही.

पण असं होत नाही. ती गोष्ट रोमांचक असते! त्या क्षणी त्याबद्दल चर्चा करणं जास्त मजेदार वाटतं. वेळेनुसार जवळच्या व्यक्ती बदलतात मान्य आहे. मनातले भाव सुद्धा नव्या व्यक्तीकडे अगदी सहज व्यक्त होतात.आणि जुन्या गोष्टींना, जुन्या व्यक्तींना विसरतेची झालर घातली जाते. त्यांच्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या असू शकतात त्यांना किंमत दिली जात नाही. त्यांचं महत्व कमी केलं जातं, चर्चेला विषय म्हणून बोलल्या जाऊ लागतात. असो! आता काय करू शकतो.

वेळ गेली सरून आणि आपण त्याचं काही देखील करू शकत नाही. आणि वाईट वाटलं तरी काही उपयोग नाही. त्याउलट ते झालं आणि पुन्हा असं काही न व्हावं याची दखल घेतली तर जास्त बरं होईल असं मला वाटतं. नका रे वाटत जाऊ भावना, स्वस्त नसतात त्या. जीव असतो त्यात एक, जो घात करू शकतो साऱ्या गोष्टींचा. मग ते नातं असो किंवा मग नात्यातलं प्रेम. उगाच आगीशी खेळून जाळून जाण्यात अर्थ नाही. किंवा पाण्याची पातळी माहित असून त्यात पोहायला जाणं निरर्थकच असतं. मन जपायला शिका! नसेल जमत तर किमान मोडू नका. खूप त्रास होतो खूपच जास्त…

@UgtWorld

Related Posts

12 thoughts on “मराठी लघु-लेख

  1. Nowadays , there is no respect,no understanding ,no value of some Emotional people’s emotions.So, Emotional people getting frustate.
    Very well said UGT.

    1. Absolutely right Manoj, we appreciate your lovely concern. we hope we do take care of people’s emotions. Thanks for the feedback have a nice time ahead.

  2. Life Is Define By Bad Things & Good Things . But, Sometimes Most Bad Things Happens By Our Most Loving People.,And That Bad Things Are Always Grater Than Good Things, Same As Written By UGT.These Bad Things Makes PRISON To Our Good Things, Happiness ,Pease & Positivity.So,Let It Go(Bad things & Wrong People). N Go Ahead.
    Make A Relationship With God , Which Can Give Us Eternal Peace.
    Always Nice Subject Written By You UGT.???

Comments are closed.