जेव्हा मायेचं नातं विसरलं जातं!

मायेचं काळीज चिरत असताना…

जेव्हा सोबतीची सवय लागते, मायेचा जिव्हाळा जिव्हारी लागतो. जेव्हा मायेचं नातं विसरलं जातं! आठवणींना जागा उरत नाही हृदयात आणि मनात सुद्धा इतक्या त्या नदीच्या प्रवाहासारख्या भरून वाहत असतात. पण काय करू शकतो त्या क्षणाला आपण काहीच नाही. अगदी काही देखील नाही. कारण आपल्याला ही माहित आहे काही गोष्टी आपल्या हातापलीकडे असतात. ज्यांना फक्त आयुष्यच हातात घेऊ शकतं.

तसंच असतं काही मायेचं! जसं आजी आणि नातू किंवा आजोबा आणि नात यांच्या नात्याचं… आई वडील सोडून जातात आपल्या मुलाचं संगोपन करायला आजी आजोबांकडे. लागेल ते देतात त्याला सांभाळायला किंवा कधी कधी ते ही देत नाहीत. पण हे क्षणिक असतं, नाही का? क्षणभंगुर आपण म्हणू शकतो. काही वर्ष आणि मग पुन्हा ते मुलाला किंवा मुलीला घेऊन जाणार आणि त्या आजी आजोबांना त्या लहान मुलाचा लागलेला लळा त्याचं काय?

असं नसतंच म्हणा, कि कायमच नात्याच्या जात्यात दळत जायचं. परंतु कधी-कधी त्या नात्याची नाळ तुटणार तर नाही ना याचा देखील विचार आपण करायला हवा कि नको. कि इथून पुढे कसं होणार काय वाटेल जेव्हा तो मुलगा पुन्हा भेटायलाच येत नाही पुन्हा. किंवा त्याला शक्य च होत नाही आपल्या आई वडिलांच्या जबाबदारी म्हणा किंवा त्याच्या स्वतःच्या कामाच्या ओझाखाली स्वतः दबून जातो. आणि या गडबडीत तो मायेचं गाठोडं कुठेतरी राहून जातं.

मायेचं काळीज चिरत असताना…

आपण बरेच क्रम आखून ठेवतो आयुष्यात. आणि त्या प्रमाणे आपल्याला आयुष्यात त्या सर्व गोष्टी करायच्या असतात. पण सगळच सोडून सगळच मिळवता येत नाही हे खूप कमी लोग जाणतात. ज्यांना आयुष्यात नात्यांपेक्षा जास्त आणखी काही वरचढ वाटू लागतं त्यांना नात्यात मुळातच रस राहिलेला नसतो. आपण कितीही काही ही म्हंटल तरी ही ते व्यर्थ च ठरतं.

स्वतःच्या नात्यांना इतकंही ताणू नका की पुन्हा जोडण्याची शक्यताच येणार नाही. किती जीव तुटतो त्या सहवासासाठी हे फक्त त्या त्या माणसांना माहीत असावं. आजीचं काळीज वाट पाहून स्मशान भूमीच्या दारात आलेलं असतं तरी देखील त्याला रोखण्यासाठी काही च कारण राहत नाही. इतकं निर्दयी तरी कसं राहता येईल कोण जाणे. मान्य आहे आजकाल काहीही होऊ शकत पण “जे होऊन गेलं आहे. ते पुन्हा दुरुस्त कधीच करता येत नाही! कधीच नाही.”

@UgtWorld




Write with us✍?

Greetings to Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us on our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts