रात्र निवांत निजली ह्या चारोळ्या कुशीत घेऊन…

रात्र चारोळ्या! रात्र उजाडली की गोष्टी उजाडतात. विचारांना पंख फुटतात. आता असं कसं म्हणलं तरी आपल्याला त्याचं कारण माहित असणारच.

आपण अनुभवलेले क्षण आठवतो ते रात्रीच्या वेळी. अगदी झोपेच्या आहारी जाताना. आणि मग विचारांची गाडी सरकली का मग स्वप्न पडतात. काही स्वप्न ही आपल्या अस्तित्वातल्या गोष्टींना जोडतात आणि अश्या चारोळ्या तयार होतात.

शब्द मोजके पण अर्थ भरमसाठ असणाऱ्या ह्या चारोळ्यांना एक झलक भावनेची मिळतेच. ह्या वाचून नक्कीच वेळ छान होईल. तसेच ह्या चारोळ्या फोटो आणि मजकूर दोन्ही फॉरमॅट मध्ये उपलब्ध आहेत.


रात्र

रात ही सोबत अशी जशी पाहावी एखादी कळी

चांदनेही असे जवळी जशी असावी गोड नदी,

आकाश फिरावं असं जशी फिरावी दुनिया सारी

हे होईल तेव्हाच जेव्हा तू असशील संगती…

रात्र

हळू हळू पुढे सरलो

धाडकन कपाटाला धडकलो,

लागलं म्हणून उठायला गेलो

आणि आळसापोटी परत झोपलो…

Related Posts