रात्र

शिरताच स्वप्नांच्या दारी
घेऊन चादरीची स्वारी,

चालवणार तू गाडी बसणार मी मागे

आता फिरू स्वप्नातली दुनिया सारी…

रात्र

रात्र ही अगदी जवळ आहे

त्यात चांदण्यांची झालर आहे,

चंद्र तर आहेच आकाश ही आहे

आणि सोबत तुझी छान साथ आहे…

रात्र

अशी ही बात अशी ही रात

ना नजर ना मुलाकात,

कसं जमेल सारं अश्या होण्यात

एकदातरी असुदे हात हातात…

रात्र

ही सांझ सावली तुझ्यासाठी

ही रात्र घावली तुझ्यासाठी,

मी तर म्हणतो सगळा निसर्गच घे

हा जीव आणि हे हृदय पण तुझ्यासाठी…

रात्र

उशीर झाला तर काय झालं

मी आहे ना,

रात्र झाली तर काय झालं

अजून वेळ तर आहे ना…

Related Posts