रात्र

रात्र फिरतीची वेळ आहे ताजी

तू दे साथ आपण मारू ही बाजी,

बघ मग किती मजा येईल त्या स्वप्नात

जिथे रंग कळीतले बोलतील तुझ्याशी…

रात्र

रात्र जवळ आली आहे,

जुनी मजा पुन्हा जागी झाली आहे,

आता फक्त तुझी वाट पाहायची आहे

बाकी सगळ त्यानंतरच आहे…

रात्र

ही रात तुझ्या सोबत होती की

जवळ तुझ्या झोप नव्हती,

अशी लवकर उठण्याची घाई होती कि

झोपेशी मैत्री दुरावली होती…

रात्र

चंद्र, चांदणे, तारे आणि नभ

वाट पाहत आहेत जरा नजर वर कर,

तुझ्याशिवाय ते जाणार नाही कुठे

तुला कुशीत घेतील, आलिंगन देतील बघ…

रात्र

रात्रीच्या संगतीची बेभान नशा

चढू लागली सकाळच्या भासात पुन्हा,

लिहू लागले शब्द त्यांची कथा

ह्या नशेत आकर्षण सापडू लागलं मला…

Related Posts