चांदण्या लखलखल्या
ह्या क्षितीजाच्या माथ्यावर,
धुंद झाली ही रात्र
निद्रेत तिच्या कुशीवर…
रात्रीची धुंदी उतरत नाही
मनासारखी झोप मिळत नाही,
ही स्वप्ने आहेत कि काही और
जेव्हा जेव्हा डोळे मिटतो झोपतच नाही..
चांदणे खुलून आले आहे
चंद्र थोडा उदास दिसतोय,
जरा नजर तरी टाक त्याच्याकडे
तुझी झलक पाहण्यासाठी तो ही वाट बघतोय…
चांदणं आज दिसलं वर डोक्यावर
म्हटलं जरा मायेची उब ठेवा तिच्यावर,
सुंदर देखावा आणि स्वच्छंदी सहवास
असंच ठेवा चेहरा तिचा आयुष्यभर….
चमचमणारी लखलखती चांदणी
चंद्राची आणि तात्यांची ती प्रमुख सोबती,
नदी तिची प्रतिमा तिच्या सहित सोबत ठेवते
अशीच आपल्या मैत्रीची धुंदी भासते…