रात्र नजदिक आहे ना
काटे ही पटापट पळतील आता,
स्वप्नांची दुनिया रमेल नक्कीच
तुझ्या सोबतीला तुझी आवड असेल आता…
ही रात्र चुकव आजची
उद्या फक्त हास्य असणार आहे,
काही ना काही कारण असेल
तेव्हाच तुला हसायला मिळणार आहे…
ही कळी तिचा सुगंध तोवर देईल
जोवर तिचा जीव आहे,
हा चंद्र तो पर्यंत रात्री चमकेल
जो पर्यंत अंधार आहे…
हा चंद्र तुझा मित्र ना
ही रात्र तुझी मैत्रीण ना,
फुल कळ्या ह्या सुगंध तुझा
हा वारा तुझी चाहूल ना….
ही रात्र अशी मग्न झालीये
तुझ्या समवेत खूप छान झालीये,
स्वप्न ही अशी रोमांचक होतील
आता सोबतच अशी घट्ट झालीये….