जराशी तारीफ हवी

माहोल तसा बनेल मग,

अबोलकी ही रात्र सुद्धा

धुंद होऊन नाचेल मग….

रात ही आली जवळ मिठीत घेऊन स्वप्नांची उब,

थोड्यावेळासाठी डोळे उघड आणि परत झाकून बघ,

ही स्वप्न-नगरी फिरायची आहे आता

चल माझ्यासोबत येऊन बघ…

झोपेची ही मजा आता खरी येईल

जेव्हा सोबत आवडीचे क्षण येतील,

आता स्पेशल फ्रेंड आणि गोष्टी

स्वप्नात फिरताना चेहऱ्यावर

मस्त हास्य येईल…

रात्रीचा मौसम भिजलेल्या वाटा

गार गार वारा अंगावर आनी काटा,

छान अशी चादर तिची ऊबदार मिठी

स्वप्नांची दुनिया तयार आता फिरण्यासाठी….

Related Posts