पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले!

पाहिले फक्त शब्द, रूप नाही पाहिले…

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले!

“पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले” हे सुरेख गाणं आज सकाळ सकाळ आमच्या टीव्ही वर लागलं होतं. हे गाणं ऐकताना मनात एक विचार येऊन गेला, हे गाणं आताच्या पिढीला किती साजेस आहे नाही का!’

महिना दीड महिन्यापूर्वीची एक घटना मला आठवली. बेगुसराय मध्ये झालेला हा प्रकार आहे. फेसबुक वर एका मुलाची व मुलीची ओळख झाली, पुढे त्या ओळखीचं रुपांतर मैत्री व नंतर प्रेमात झालं. इथपर्यंत ठीक होत, परंतु नंतर विवाहा आधी गर्भधारणा आणि मुलाकडून झालेली फसवणूक हा टप्पा ह्या ओळखीने गाठला. ह्या घटनेचा सोक्षमोक्ष लागला, मुलीला न्याय सुद्धा मिळाला. परंतु वाढत्या सोशल मीडिया च्या जाळ्यात युवा पिढी किती अडकत चालली आहे हे कोणाच्या लक्षात येतंय का?

सध्याच्या स्पर्धात्मक जगामध्ये टिकून राहण्यासाठी आज प्रत्येकजण रात्रीचा दिवस करून मेहनत घेतोय. पण हे सगळ करत असताना स्वतःला आणि स्वतःच्या माणसांना वेळ द्यायला विसरतो आहे. ह्या मधून येणारं एकटेपण दूर करण्यासाठी माणूस सोशल मीडिया चा आधार घेऊ लागलाय. आता सोशल मीडिया म्हटलं की तिथे ओळखीची किंवा अनोळखी अशी बरीच प्रोफाइल आपल्याला पाहायला मिळतात.

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले!

मग त्यातलं एखाद प्रोफाइल आवडल्या नंतर त्याला इंप्रेस करण्यासाठी दिखावे केले जातात. ओळखत नसल्याने समोरचा म्हणेल ते खर असं म्हणत ही ओळख आकार घेऊ लागते. परंतु ह्या मध्ये ‘दिसतं तस नसतं’ ही साधी गोष्ट माणूस विसरून जातो. कोणावर किती विश्वास ठेवायचा या सारख्या साध्या गोष्टी न कळल्याने फसवणुकीचे प्रकार घडतात.

आता सोशल मीडिया वर जुळणारी सगळीच नाती बोगस असतात असं माझं म्हणणं नाही. काही जण होतात देखील यशस्वी, परंतु आपल्याला खरं खोटं ओळखता येणं खूप गरजेचं आहे एवढंच माझं म्हणणं आहे.

सुहानी (Rasika Kawale)✍️


Write with us✍?

Greetings to Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us on our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts