पक्षातले पक्षी

जे पक्षी कायम घरट्यातच असतात

पक्षातले पक्षी

आपण अनेक पक्षी बघतो. असंख्य पक्ष बघतो, त्यांची होणारी वाढ बघतो आणि त्यांना सांभाळून ठेवणारं झाड ही बघतो. हेच पक्षी त्या झाडावर लहानाचे मोठे होतात. ते झाड त्यांना आयुष्यभर पोसतं. पण जेव्हा झाडाला पोसायची वेळ येते तेव्हा मात्र हे पक्षातले पक्षी नामानिराळे होतात. का?

तर त्यांना पैशाच्या झाडाची ओढ असते. पैशाच्या झाडाची फळे त्यांना हवीहवीशी आणि खावीशी वाटतात. ह्या साठी ते स्वतःच्या झाडाचे हाल हाल करतात. झाड ज्यांच्या जीवावर वाढायला हवे, ज्यांच्यामुळे त्यांची बहार व्हायला हवी तेच झाडाकडे ढुंकून सुद्धा पाहत नाहीत.

पैशाचं झाड वाढत राहतं. पैशाच्या झाडाला जे जे हवं ते ते ह्या झाडाकडून ते पक्षांमार्फत घेत राहतं आणि हे झाड मात्र कोमेजून हळू हळू मरू लागतं. झाड शेवटपर्यंत पक्षांच्या परतण्याची वाट पाहत राहतं. पण पक्षांना मात्र त्यांच्या त्यांच्या पक्षात गुंग राहायचं असतं. आपला पक्ष बळकट करण्यात ते इतके काही गुंतलेले असतात की त्यांना कमजोर झालेल्या झाडाकडे बघण्यात काहीही रस नसतो.

पक्षातले पक्षी

झाडाकडे बघणाऱ्या इतर झाडांना वाटते, झाड पक्षांमुळे उभे आहे, पक्षांनी झाडाला आधार दिलाय पण झाड मात्र त्याच्या मुळांच्या जीवावर उभे असते, झाड आशेवर उभे असते की कधी त्याचे पक्षी त्याच्यासाठी काहीतरी करतील, कधी विकासाची नवीन बीजे रुजवतील पण पक्षी शेवटपर्यंत राजकारणात आणि पैशाच्या झाडात तल्लीन असतात.

असेच सुरू राहिले तर हे झाडरुपी देशाचं स्वरूप हळूहळू कोमेजेल, कालांतराने ते मरणाच्या दारात उभे असेल आणि पक्षी तेव्हाही पक्ष वाचविण्याच्याच प्रयत्नांत असतील. पक्षांनी हे जाणले पाहिजे की त्यांचे खरे अस्तित्व झाडापासून सुरू होते. त्यांचे जीवन मरण झाडामुळे आहे, त्यांनी पक्षाचा विचार न करता आधी स्वतःचे झाड जगवले पाहिजे…

-शायAr

Related Posts

2 thoughts on “पक्षातले पक्षी

Comments are closed.