प्रत्येक वेळी मीच का सॅक्रिफाईस करायचं?

मीच का माझ्या प्रेमाची वैरी व्हावी!

प्रत्येक वेळी मीच का सॅक्रिफाईस करायचं?
प्रत्येक वेळी मीच का सॅक्रिफाईस करायचं?

किती छान वेळ होती, गोष्टी सगळ्या ठीक ठाक सुरु होत्या. एका चालत्या बोलत्या रिलेशनशिप मध्ये असताना मनात दुसऱ्या प्रेमाचा विचार कसा आला नाही माहित. म्हणजे ती वेळ वाईट नव्हती आणि कधीच नसेल पण तो सहवास पुरेसा पडत नव्हता कदाचीत किंवा मग फक्त समोरच्याला दिलेला शब्द हा प्रेमावर हावी होत होता. मीच बहुदा जास्त विचार करत होती.

निलेशला वाईट वाटेल जर मी सांगितलं त्याला की मला प्रेम झालंय तुझ्याव्यतिरिक्त कोणावर तरी. कारण एका चांगल्या रिलेशनशिप मध्ये असणं म्हणजे फक्त समजूत नसून फायदा नाही ना. काही गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं असतं. शारीरिक सबंध तर आज खूप सामान्य बाब आहे, तरीही काही जण आहेत ज्यांना ते करणं अवघड जातं. पण तो प्रत्येकाचा वयक्तिक प्रश्न असतो. आणि त्याप्रमाणे ते ठरवतात त्या गोष्टीबद्दल.

निलेश ला दिलेली कमिटमेन्ट मोडून त्याला दुःख देऊ कसं हा प्रश्न पुढ्यात होताच पण माझ्यासाठी अखिलचं प्रेम ही गरजेचं होत, जे मला झालं होतं त्याच्यावर कारण माझे मूड स्विंग, माझं अबोल मन बोलकं करणं, आणि सहवासात सोबत देणं.

हे सगळं मी निलेशशी बोलून घेतलं आणि त्याने न काही वाईट वागता ते मान्य सुद्धा केलं माझ्यासाठी. कारण त्याला कळलं होत कमिटमेन्ट पेक्षा जास्त इम्पॉर्टन्ट प्रेम असतं. पण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा निस्तारल्या तेव्हा कळलं ज्याच्यावर माझं प्रेम आहे आणि ज्याला मी होकार देणार त्याच्या मार्गावर काही जण आहेत. असं नाही की अखिलने मला विचारलं आणि मी मन राखण्यासाठी होकार देणार होते माझं प्रेम जडलं होत त्याच्यावर जसं मी आधीही सांगितलं. पण मग वाईट इतकंच वाटलं की जी गोष्ट मी माझ्यासाठी निवडली तीच का बाकीच्यांना हवी होती त्याच वेळेला. माझ्या होकाराआधी तुम्हाला सुचलं नाही का ते?

प्रत्येक वेळी मीच का सॅक्रिफाईस करायचं?
प्रत्येक वेळी मीच का सॅक्रिफाईस करायचं?

मला काही व्यक्तींच्या अखिल प्रति असणाऱ्या भावना जाणवू लागल्या होत्या. नशीब इतकंच चांगलं की त्याला ह्या गोष्टी माहित नव्हत्या आणि तो कदाचित माझ्यासाठीच आहे म्हणून असं झालं असावं. पण मी का माझं प्रेम सोडू, माझी आवड सोडू. आणि नेहमी मीच का. यावेळेला मला ते करणं शक्य नव्हतं हे मला माझ्या मनानी ठाम सांगीतलेलं. मला कोणी स्वार्थी म्हटलं तरी चालेल. पण खरं खोट हे त्याला आणि मला माहित होतं. त्याच्या काही मैत्रिणी त्याला विचारून झाल्या रिलेशनशिप साठी पण ह्याने नकार दिला त्या सर्वांना फक्त माझ्यासाठी. मग मी का म्हणून त्याला कोणासाठी तरी जाऊ देऊ. 

माझा जुना बॉयफ्रेंड निलेश आणि माझ्यामध्ये खूप छान समजूत होती म्हणून त्याने माझ्या प्रेमाखातर मला समजून जाऊ दिलं आणि आम्ही अजूनही चांगले मित्र आहोत. कदाचित प्रेम नव्हतं तितक्या तीव्रतेचं किंवा मग खूप वर्षांपासूनची मैत्री असेल. जर तो इतकं करू शकतो तर मी माझ्या प्रेमासाठी अखिलसाठी माझी आवड गमावणं, माझ्या प्रेमाला गमावणं मूर्खाच ठरेल. 

मी माझं प्रेम सोडू शकत नाही, हे समोरच्या व्यक्तीला कळलं असावं आणि त्या व्यक्तींनी माझ्या प्रेमाला मोकळं करावं असंच मला वाटतं. आणि ते तसं झालं असावं बहुदा. काही जण माझ्या होकारांनंतर रिलेशनशिप मध्ये असे काही आले जणू आता त्यांना गरज कमी आणि काहीतरी साध्य करायचं आहे असं वाटलं. अखिलला सगळ्या गोष्टींची जाण आहे माझ्याबाबतीतली. त्यामुळे मी माझी आवडती व्यक्ती कोणासाठी देणं अशक्य आहे, मला कदाचित ते जमणारच नाही.           

@UgtWorld

Related Posts