मानसिकता जी कदाचित तुम्हाला घडवू शकते…
आपली मानसिकता नेहमीच चांगली असेल नाही पण किमान ती सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न असावा. आपल्याजवळ नेहमी दोन दृष्टिकोन असायला हवेत समस्यांना तोंड द्यायला, वाद आणि प्रतिवादासमवेत. मुख्यतः जर तुम्ही त्या समस्या तुमच्याजवळ बोलत आहात तर जवळजवळ तुम्हाला सगळ्याच बाजू मिळतील उत्तर शोधायला. तुम्ही मुळातच योग्य तो मार्ग निवडायला हवा. अथवा वैतागून जाल सारखा सारखा तोच मार्ग निवडून.
हा! ह्याने थोडी डोकेदुखी होईल आणि निराश होऊन मग स्वतःला चुकीचा निर्णय घेण्यास भाग पाडाल. पण पुन्हा मग तोच मनःस्ताप सतावणार. ह्यापेक्षा समंजस आणि शांततेत निर्णय घ्यावा. मन खरं तर शांत असायला हवं. त्याने मुळात समजून असायला हवं कि वास्तवातील जाणीव काय आणि आंधळेपणातील आशा काय!
आशा ठेवा, नाही असं नाही पण अधुंक आशेवर राहू नका कारण तिथे फक्त तुम्ही गोष्टींपासून किंवा व्यक्तींपासून आशा लावून धराल आणि आपल्या कल्पनेत राहाल. ह्याने तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो कारण अचानक जर वास्तव समोर आलं तर ते झेलणं नक्कीच त्रासदायक ठरू शकतं. मला माहित आहे कुणालाच तो क्षण नको असतो. सर्वांनाच सहज उत्तरं हवी असतात. पण प्रत्येक वेळेला तसं होईल असं नाही ना! तुम्हाला प्रत्येक गोष्टींसाठी तयार असणं गरजेचं आहे.
प्रत्येक परिस्थिती वेगळी असते तिच्या दृष्टिकोनातून. कोणीच सुरुवातीला कणखर नसतं पण अखेरीस सगळेच होऊन जातात एका क्षणाला येऊन. तर हे सगळं परिस्थिती वर असतं. आपल्या आयुष्यात समस्या येतात आपल्याला शिकवतात आणि ह्या आयुष्याच्या प्रक्रियेत ते शिकवतच राहतात.
आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी शिकतो पण त्या आपण स्वीकारत नाही. जर आपण त्या स्वीकारू लागलो तर आयुष्य खूप सोपं होऊन जाईल आणि आपल्याला गरजेपेक्षा जास्त विचार करावा लागणार नाही. अति विचार अर्थातच आपल्यासाठी चांगला नाहीए. सकारात्मक मानसिकतेकडे जास्त भर द्या. जितकं आपण त्याकडे लक्ष देऊ तितकं आपण आपल्या भविष्याकडे चांगलं पाऊल टाकू शकू.