सोशल च्या नादात वाटच चुकली…
दोन्ही शब्द कसे जुळतात ना एकमेकांशी! सोशल आणि शोषण. जेव्हा खूप काही गोष्टी करत असताना आपण आपल्या चांगुलपणाचं माप घ्यायला विसरतो. तेव्हाच सगळ्यात जास्त धुमाकूळ उडालेला असतो. आपल्या मनातल्या गोष्टींची डोर दुसरच कोणी ओढू लागलं की आपल्या पायात दोरखंड पडतात. त्या दोरखंडाना अपेक्षांचे गज असतात. जे तुम्हाला कुठेही जाऊ देत नाही.
सोशल म्हटलं की मनात सगळे सामाजिक विचार येतात किंवा मग आजकालच्या हिशोबाने सोशल मीडिया इतकंच डोक्यात येतं. पण मुळात हा मुद्दा वेगळा आहे. आपण या भानगडीत आपल्याच आजूबाजूच्या गोष्टी विसरून जातो. चांगलं करण्याच्या नादात काही जण इतकं काही करून घेतात की पुढे बोलायला जागा उरली नाही. ते जाणतात की व्यक्ती त्याच्या व्यापात असू शकते तरीही त्यांना हवं ते बोलून दाखवणार आणि आपण आता मन नको दुखवायला म्हणून तसं करणार. याचाच जास्त फायदा घेतला गेलाय आजवर.
कोणाला नावं ठेवायला कशाला हवंय माझंच नाव देतो उदाहरणासाठी. “उदय इतकं करून दे रे, उदय इकडे जायचं आहे वेळ मिळाला तर जाऊन येऊया.” कोणाला तरी काहीतरी हवंय म्हणून उदय आहे ना! कुठे न्यायचं असेल काही उदय आहे ना! कोणाला गरज पडतेय उदय आहे ना! अशा कित्येक गोष्टीत समोरचा दिसतोय म्हणून त्याला राबवून घ्यायचं हे कितपत योग्य आहे हे तर आता मला कळतच नाही. कित्येक जण अशा पिंजऱ्यात अडकलेले असतात.
सोशल करायच्या नादात किती शोषण झालंय हे फक्त त्यालाच माहित असतं जो समोरच्याच मन न मारता हे सगळं करतो. सोशलची सुरुवात घरातून होते, तिथून मग ते नातेवाईकांकडे आणि तिथून ही पोट नाही भरत मग मित्रमैत्रिणी असतातच. खरतर आपणच याला वाट देतो, आपणच सांभाळून घेतलं ना की हे शोषण जरासं कमी होऊ शकतं. सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत बसायला देवाला ही वेळ नसतो. आपल्याकडे तो असेल हा गैरसमज मनात नसावा.
Write with us✍?
Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld.For more information click on the following link??