डॉ. बाबासाहेब आंबेडकर – Dr. Babasaheb Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक कार्ये – Social work done by Dr. Babasaheb Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक कार्ये - Social work done by Dr. Babasaheb Ambedkar

महाराष्ट्र म्हणजेच महान राष्ट्र आणि ह्या महाराष्ट्राच्या मातीत अनेक महान लोक होऊन गेले. त्या महान लोकांनी समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा, चालीरीती, जातीयता, अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. कनिष्ठ जातीतील लोकांना त्यांचे हक्क अधिकार मिळून देण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास करवून देण्याचा प्रयत्न केला. त्यापैकीच एक थोर व्यक्तिव म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इतरांना शिक्षण घेण्याचा आदर्श स्वताच्या जीवनातून दिला. बाबासाहेबांनी अत्यंत कठिन परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण कोणाचेही जीवन बदलू शकते हे त्यांच्या लक्षात आले. ते स्वता उच्चविद्याविभुषित होते. परदेशातील विद्यापीठातुन अर्थशास्त्रात पदवी संपादन करणारे बाबासाहेब पहिले भारतीय होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक कार्ये - Social work done by Dr. Babasaheb Ambedkar

त्यांना भारतीय समाजातील कनिष्ठ जातींतील लोक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत याची जाणीव झाली होती. केवळ शिक्षणाच्या अभावानेच आपल्या या लोकांची ही परिस्थिती झाली होती याची जाणीव त्यांनी कनिष्ठ जातींतील लोकांना करून दिली. कनिष्ठ जातीतील लोकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी प्रोत्साहन दिले. शाळेत जाणाऱ्या या मुलांना त्यांनी शिष्यवृत्ती, गणवेश,भोजन आणि निवारा अशा मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा उन्नतीचा मूलमंत्र दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कनिष्ठ जातींतील लोकांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. ४ जानेवारी १९२५ साली त्यांनी सोलापूर येथे एक वसतिगृह स्थापन केले. त्याद्वारे कनिष्ठ जातींतील विद्यार्थ्यांना निवास,जेवण,गणवेश आणि शैक्षणिक साहित्य पुरविले. पुढे सोलापूर नगरपालिकेकडून चाळीस हजार रुपयांचे अनुदान प्राप्त करून दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक कार्ये - Social work done by Dr. Babasaheb Ambedkar

भारतातील कनिष्ठ जातीमधील लोकांना मंदिरामध्ये प्रवेश नाही. शाळा, विहिरी, दवाखाने, रस्ते अशा सार्वजानिक ठिकाणी कनिष्ठ जातीमधील लोकांना मुक्त वावर नव्हता. तसेच त्यांना पायात चप्पल घालने, छत्री वापरणे, घोडा वापरणे, जमीन विकत घेणे या गोष्टींना मनाई होती. थोडक्यात मुलभुत मानवी हक्कांपासुन कनिष्ठ जातीतील लोकांना वंचित केलेले होते.

बाबासाहेब आंबेडकर यांनी याविरुध्द चळवळ उभारली. सत्याग्रहाच्या माध्यमातून अस्पृश्यांना त्यांचे हक्क प्राप्त करून देण्यास लढा उभारला. महाड येथील चवदार तळे अस्पृश्यांना खुले करून देण्यासाठी तसेच नाशिकातील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी सत्याग्रह केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९३० मध्ये लंडन येथे झालेल्या पहिल्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले. त्या परिषदेमध्ये त्यांनी भारतातील अस्पृश्यांची परिस्थिती सर्वांसमोर मांडली. त्यांनी अस्पृश्यता निर्मुलनाची जोरदार मागणी केली. कारण अस्पृश्यांना भारतात कोणतेही राजकीय हक्क त्यावेळी नव्हते. अस्पृश्यांना राजकीय प्रवाहात आणणे आवश्यक होते. अल्पसंख्याकांसाठी नेमलेल्या समितीसमोर त्यांनी भारतातील सर्व अस्पृश्य समुदायाच्या मूलभूत हक्कांचा एक जाहीरनामा तयार करून सादर केला. या जाहीरनाम्यात त्यांनी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्यात यावा अशी मागणी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक कार्ये - Social work done by Dr. Babasaheb Ambedkar

ब्रिटिश सरकारने हा जाहीरनामा मान्य केला. परंतु महात्मा गांधीजींनी मात्र या जाहीरनाम्याला विरोध केला. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ या मागणीला गांधीजींनी विरोध केला. त्यासाठी त्यांनी पुण्यातील येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरु केले. बाबासाहेबांनी शेवटी गांधीजींची भेट घेतली. त्याभेटीत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी सोडली आणि त्याऐवजी कायदेमंडळात अस्पृश्यांना राखीव जागा असाव्या याला मान्यता दिली. हाच सुप्रसिध्द पुणे करार होय.

१३ ऑक्टोबर १९३५ ला नाशिक जिल्यातील येवला या गावात भरलेल्या परिषदेत भाषण करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे जाहीर केले की, ‘दुर्दैवाने मी हिंदू धर्मात अस्पृश्य म्हणून जन्मलो, हे माझ्या हातात नव्हते. परंतु मी असे जाहीर करतो की, मी हिंदू म्हणून मरणार नाही! याठिकाणीच बाबासाहेबांनी धर्मांतराचा निर्णय घेतला. कारण जातिव्यवस्था ही भारताला एक शापच आहे. त्यामुळ अस्पृश्यांची परिस्थिती आणि सामाजिक दर्जा सुधारणार नाही. धार्मिक गुलामगिरीतुन मुक्त होण्यासाठी धर्मांतर करणे आवश्यक आहे असे बाबासाहेब यांना वाटले. बाबासाहेबांनी धर्मांतराचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी बौद्ध, इस्लाम, ख्रिचन, आणि शीख या धर्मांचा सखोल अभ्यास करून शेवटी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याचे ठरविले.

Social work done by Dr. Babasaheb Ambedkar

त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. पुढे त्यांनी १९४२ मध्ये ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरू यांच्या नेत्रुत्वाखालील मंत्रीमंडळात ते कायदेमंत्री होते. ऑगस्ट १९४७ मध्ये त्यांची भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. बाबासाहेबांनी लिहालेल्या राज्यघटनेची अमलबजावणी २६ जानेवारी १९५० ला झाली. ही बाब आपल्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.

त्यांनी आपल्या लाखों अनुयायांसह १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपुर येथे बौद्ध भिक्खू चंद्रमणी महस्थविर यांच्या हस्ते बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. मात्र यानंतर काही काळातच ६ डिसेंबर १९५६ ला दिल्ली येथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले आणि भारत मातेचा महान सुपुत्र आपल्याला सोडून गेले. मात्र त्यांचे विचार आणि कार्य हे आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे आजही प्रकाश देत आहेत. ३१ मार्च १९९० ला भारत सरकारने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अशा या थोर महापुरुषाला आमचे शतशः प्रणाम…

@TeamUgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link??

Related Posts