Suhani ‘s Poetries
Here, we can read blogs of the young poetess, Rasika Kawale aka Suhani. Must read her Poetries and other write-ups and do comment and share with your friends and family!
नाही….

आठवांची आठवण आता, इतकी काही येत नाही
नभीचा चंद्र पाहण्यास, तो चकोर काही येत नाही
तेव्हा गुणगुणल्या गाण्याला, दाद तितकी येत नाही
कवितेतही वाळवंटी वास्तव, प्रेमाचे मृगजळ काही येत नाही
लाल गुलाब तो हृदयामधला, त्याला बहर काही येत नाही
काट्याच्या त्या रांगा अंगभर, त्याचा सुगंध काही जात नाही
सोबतीने चाललो वाट जी, आता तिथे जायचे नाही
पुन्हा म्हणतो घ्यावा हात हाती, आता हिंमत इतकी येत नाही
-सुहानी✍🏻💕
गर्दीत हरवलेली ओळख!

पहावे जिथे ओढेच ओंढे चहूकडे
कधी लाघवी कधी हसरे
कधी रागीट कधी फसवे
बहुरंगी चेहेरे पाहू तिकडे
प्रत्येकाची अलग व्यथा
प्रत्येकाची अलग कहाणी
ज्याने त्याने घालाव्या
आपल्याच पायात आपल्या वहाणी
ना जाणे आज वेदना कोणती
ह्या सुमुख हसऱ्या चेहेऱ्यामागे
आपल्याच गर्दीत हरवलेली
कोणती ओळख आजच्या भेटीमागे
दाह धगधग वास्तवाचा
जळती निरागस भावना
व्यवहारी त्या जीवनाच्या
ना उरती काही कामना
स्वतःची वाट शोधतो मी
हरवलेल्या आपल्याच गर्दीमध्ये
मोकाट सुटावे म्हणतो एकदा
वास्तवाच्या व्यवहारी लोंढ्यांमध्ये…
-सुहानी✍🏻💕