अर्धवट स्वप्न आणि त्यांची गोष्ट!
आपण बरीच स्वप्न बघतो. त्यातली अर्ध्याहून जास्त आपल्या कल्पने पलीकडची असतात. मधूनच सुरु होतात अगदी स्वप्नांत देखील. मानसशात्रात तर असं म्हणतात जे आपण आधीपासून जाणतो त्याच गोष्टी आपल्या स्वप्नात घडत असतात. परंतु त्या अस्तिवात येताना त्यात खूप बदल घडून येतात आणि प्रत्यक्षात ते वेगळ्या स्वरूपात आपल्या समोर येतात.
शास्त्रज्ञ देखील आजकाल खूप संशोधन करत असतात. REM म्हणजेच रॅपिड आय मुव्हमेंट हा एक झोपेचा प्रकार असून ह्यात विचित्र स्वप्न अधिक पडत असतात. पण ह्याच्या उलट जर REM नसेल तर मात्र आपली स्वप्न फार रटाळ आणि धीम्या गतीची असतात. त्यात सुद्धा काही नुकतेच घडलेले क्षण असतात किंवा मग नुकत्याच झालेल्या गाठी-भेटी.
आपण एखादं स्वप्न बघत असू. त्या दरम्यान एखाद्याने आपल्याला इतर कोणी उठवलं. किंवा आपल्या घड्याळाच्या अलार्म ने उठलो तरीही आपण त्या स्वप्नांना पुढे तिथूनच बघू शकतो. पण तेच जर आपण स्वतःहून उठलो तर मात्र आपण तसं नाही करू शकत. Medial prefrontal cortex हा एक मेंदूचा भाग असून मेंदूच्या पुढल्या बाजूस असतो. आपल्या स्वप्नांना पुन्हा आठवण्यास किंवा जिथून आपण उठलोय अर्धवट स्वप्न बघून तिथून पुढे बघण्यास ह्याच उपयोग होतो.
आपल्या वयोमानानुसार ह्या गोष्टी होत असतात. जर वय अधिक असेल तर स्वप्नांना आहे तिथून पुढे बघण्यास नाही जमत तेच तर वय कमी असेल तर मात्र आपण आहे तिथूनच पुढे स्वप्नांना सुरु ठेवू शकतो. कारण मेंदू मध्ये त्या स्वप्नांच्या आठवणी ताज्या असतात. त्यामुळे ती पुढेही सुरु राहू शकतात. अश्या बऱ्याच रोमांचक गोष्टी आपल्या स्वप्नाशी आणि झोपेशी निगडीत आहेत. जाणून घेऊ हळू हळू… तोवर छान झोप घ्या, स्वप्न बघा, शक्य असेल तितक्या वेगाने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील करा.
- 10 Promising career Opportunities in Artificial Intelligence (AI)
- The Hidden Crisis of Overworked Workers in India
- 10 Best Places to Visit in India During Navratri
- The Business of Entrance Exams in India
- How to Treat Girls/ Women?