नवे क्षण जगवणारे भेटीचे ते १० दिवस…

आयुष्यातले अनपेक्षित असे आवडीचे दिवस !

नवे क्षण जगवणारे भेटीचे ते १० दिवस…

ही सकाळ यावी अन मी खुश होऊन उठावं, सर्व तयारी करून मस्त घरातून निघावं माझी बॅग घेऊन! नवे क्षण जगवणारे भेटीचे ते १० दिवस… पहिला दिवस होता तो कामाचा, सगळीकडे शोधून झालं होतं;कुठेच काम नव्हतं मिळत . म्हटलं आलीय संधी तर बघूया काम करून काही दिवस. अशा हिशोबाने चाललं होतं पण पहिला दिवस हा उत्साहात गेला कारण भेट होणार होती ना तिची सकाळ सकाळी मग मन तर खुश असणारच त्यावेळी! पहिल्याच दिवशी झाली भेट बस स्टॉप वर, ती अगदी आश्चर्यचकित झाली.

तिने विचारलं,”इथे कसा काय तू?” मी म्हटलं,”अरे तुला बोललो होतो ना तुझ्याजवळ आहे मग आलो तर जवळ” ती बोलते,”वाह! इतक्या पटकन आलास तू. काय खरं नाही” मी म्हटलं,”तू बोलणार आणि ते मी नाही केलं असं कधी झालंय का?” ती म्हटली,”हो ते मलापण माहित आहे.” आणि मग आलो दोघं पण बस पकडून कामाजवळ, तिथून पुढे जाण्याची इच्छाच होत नव्हती पण काय करणार, तिला झालेला उशीर मग जावं लागलं. दुपार झाली, लंच टाइम म्हणून बाहेर पडलो आणि तिला कॉल केला, तिने विचारलं,” जेवणाचं काय?” त्यावर मी म्हटलं, “आज पहिला दिवस आहे म्हणून डबा नाही आणला मी.” त्यावर लगेच ती म्हटली,”थांब तिथेच थोडा वेळ,आले मी डबा घेऊन.” मनात नकार होता पण नंतर विचार केला की तिचं मन कसं तोडायचं म्हणून म्हटलं, ठीक आहे आण.

एक दिवस तिला म्हटलं सुध्दा की तू खूप छान आहेस. ती म्हणते, डबा दिला म्हणून ना! मी म्हटलं,”नाही रे, तू आहेसच छान आणि मला भेटलीस ना आता म्हणून असं बोललो मी, बाकी काही नाही.” अशीच दुपारची वेळ संपली आणि संध्याकाळ कंटाळवाणी होत गेली,कामात लक्ष नव्हतं. असं करता करता पहिला दिवस कामाचा कसाबसा गेला. घरी आलो, म्हटलं आज तर झालं काम,आता उद्याचं काय? पुन्हा तोच विचार आला मनात,ती आहे ना तिथे मग होईल भेट आणि कामाचं पण बघू काही दिवस. असं म्हणत रात्रीची सकाळ झाली आणि दुसरा दिवस आला. त्या दिवशी सकाळी भेट झाली नाही, दुपारीच भेटलो आम्ही. असे या दहा दिवसातले कित्येक दिवस आम्ही असंच भेटलो, कधी सकाळी तर कधी दुपारी.

तिसरा दिवस मात्र भारीच होता,ती गावाला चालली होती. मी सहजच जेवणाच्या वेळेत तिला भेटायला गेलो होतो, तेव्हा मला कळलं की ती गावी चाललीय. मी म्हटलं,”कधी येणार?” ती म्हटली,”येईन काही दिवसात लगेचच.” मग म्हटलं,”फोन असेल ना चालू तिथे?” त्यावर म्हणते कशी, आधी कॉल लावून तर बघ! तेवढ्यात आमच्या मैत्रिणीचा कॉल आला,”अरे तुला माहित आहे का ती गावी चाललीय.” मी मुद्दाम म्हटलं की नाही माहीत मला आणि ती म्हटली, ती येणार आहे मला भेटायला. मी म्हटलं, तूच ये इथे मग, आपण भेटू एकत्र तिला,खूप विनवण्या केल्या नंतर ती म्हटली, ठीक आहे येते. ती येईपर्यंत आम्ही दोघं बोलत होतो त्याबद्दलच. तिला म्हटलं, तू ये आवरून, मी भेटतो काही वेळेतच, मीपण येतो सांगून ऑफिसमध्ये. ती बोलली,”ठीक आहे.”

त्यादिवशी आम्ही तिघे बाहेर जाणार होतो आणि ती जाणार होती म्हणून थोडा वेळ तिच्यासोबत घालवला. आता ती निघण्याची वेळ झाली,मी मनात म्हटलं,”यार काय लगेच घरी जायचं? पण नंतर म्हटलं जाऊदे तिला उशीर होईल.” असं बोलत आम्ही घरी आलो. नंतर ती गावी जाऊन आल्यानंतर आमचा भेटीचा ४था दिवस पण सकाळी भेट झाली, मस्ती गप्पा मध्ये रंगलेली अशी! पाचव्या दिवशी ही अशीच भेट झाली. असा एकही दिवस नव्हता त्या १० दिवसात ज्या दिवशी आम्ही भेटलो नाही. हा तिसऱ्या दिवसाची रात्र आणि दुसऱ्यादिवशी ती भेटणार नाही याने थोडं उदास होतं मन, पण ती सकाळी आली गावाला जाऊन सुद्धा. विचारलं तर म्हणते, किती लांब आहे गाव माझं, इन मिन ३ तास! त्या दिवसांचे प्रत्येक क्षण मी मनात असे काही रुजवून ठेवलेत जे कधी विसरता येणार नाही, कारण माणूस त्याच गोष्टी विसरतो ज्या त्याला नको असतात.

त्या १० दिवसांतले एक दिवस दुपारी आम्ही भेटलो तेव्हा कळलं की काम जास्त असल्यामुळे तिला उशीर होणार होता. म्हटलं मग भेटू आपण संध्याकाळी, ती म्हटली, माझी काही हरकत नाही थांबेन मी. ऑफिस मधून सुटताना तिला कॉल केला मी आणि आम्ही भेटलो त्यादिवशी. ती संध्याकाळ पुन्हा यावी या हेतूने ती आली असावी पण मी खूप खुश होतो कारण बऱ्याच दिवसानंतर आम्ही निवांत भेटणार होतो. आणि तसंच काहीसं झालं, काय धमाल आमची,इतकी मस्ती केली ना! ते तिलाही आणि मलाही चांगलंच ठाऊक आहे. तो दिवस अविस्मरणीय होता. आणि त्या दिवसाची मजा तर काही वेगळीच होती. सोबत घालवलेला एकेक क्षण फार छान होता. ते दिवस माझ्या आयुष्यातले अतिशय सुंदर दिवस होते.

ते १० दिवस माझ्यासाठी नेहमीच स्पेशल नि खूप जवळचे असतील. आहेतच मुळात, त्याची प्रत्येक आठवण ताजी आणि तशीच जी त्यावेळी होती. कधी कधी काही भेटीचे अनुभव अल्पकाळात ही खूप छान मिळतात जे वेगळ्या गोष्टींतून आयुष्यभर केलं तरी कमी पडतं. त्यामुळेच कमी पण आवडीचे असे क्षण जवळ असतील तर जास्त क्षणांची गरज लागत नाही.

@UgtWorld

Related Posts