वेळेला कोणताही प्रतिसाद धोका देतो!

त्या वेळेला त्रास ही तितकाच होतो…

वेळेला कोणताही प्रतिसाद धोका देतो!

आपण कित्येक वेळेला गोष्टी आधीच ठरवून ठेवतो. आपण त्याप्रमाणे वागू आणि बोलू लागतो. पण असं काहीतरी होतं आणि मग आपल्या सगळ्या प्लॅन वर पाणी फिरून जातं. वाईट वाटणारच साहजिक आहे ते. त्याला त्या क्षणाला तरी आपण काहीच नाही करू शकत. पण पुढे काय करायचं याचा विचार करण्याचा सुद्धा मूड निघून जातो आपला. कारण सगळं आधीच ठरवून आपण पुढच्या गोष्टींची आखणी केलेली असते ना!

अर्थात तो काळ किंवा ती वेळ जराशी नाराज करून टाकते आपल्याला. हरकत नाही, पुन्हा कधीतरी असं म्हणत पुढे सरतो. कारण आपल्याला माहित असलेल्या प्रतिसादाशी जेव्हा आपण रिस्क घेतो तेव्हा मनातून आपल्याला उत्तर कळलेलं असतं. पण तरीही मनाच्या समाधानासाठी आपण ते करून पाहतो.

सांगायचं झालं तर एखाद्या वेळेला आपल्याला कुठे जाण्याची संधी मिळत असते पण काही कारणास्तव आपल्याला तिथे जाता येत नाही किंवा जमत नाही. आता नाही तर नंतर जाऊ असं स्वतःच्या मनाला समजावत असतो. मला खात्री आहे ह्या प्रसंगातून सगळेच गेले असावेत. अर्थात आपण त्यातून बाहेर पडतो, थोडा वेळ जातो पण येतो बाहेर.

आयुष्य आपल्या आयुष्यातील कित्येक गोष्टींची शाश्वती घेत असते. जसं आपल्या सोबतीला असणारे मित्र, आपले चांगले वाईट क्षण, आपलं प्रेम, आपली नोकरी किंवा आपल्या आवडीचं शैक्षणिक क्षेत्र. या सगळ्या गोष्टी आयुष्यात आपल्याला हव्या तश्या मिळतातच असं नाही किंवा नाही मिळत असंही नाही. ते जर त्या वेळेला होत असेल तर तो आपल्या चांगल्या वेळेतील काळ समजूया. जर का नाही होत असेल ते तर अजून आपली चांगली वेळ येणं बाकी असावी असं समजूया.

प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेला मिळत गेली तर त्या गोष्टींना किम्मत राहत नाही. वेळेला मिळालेला नकार सुद्धा पुढे जाऊन आपल्याला काहीतरी चांगला मार्ग किंवा आपल्याला हवा असणारा क्षण देऊ शकतो. त्यामुळे नाराजी काही वेळेपुरतीच असावी कोणत्याही नावडत्या गोष्टींसाठी. कारण जसं आवड बदलायला वेळ लागत नाही तसंच नावड आवडीत बदलायला ही वेळ लागत नाही.

@UgtWorld

Related Posts